Breaking News

सीबीएससी पॅटर्न विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविणे ही भूषणावह बाब - डॉ.मुळे


कोपरगाव /प्रतिनिधी: समता इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता 10 वीच्या सीबीएससी पॅटर्न मधील मुलांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणे, ही भूषणावह बाब असल्याने गौरवोद्गार डॉ. दत्तात्रय मुळे यांनी काढले. समता पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात समता स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. मुळे बोलत होते. 

अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आतीश काळे होते. यावेळी समता नागरी सहकारी पतसंस्था व समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष काका कोयटे उपाध्यक्ष रामचंद्र बागरेचा, संचालक अरविंद पटेल, राजकुमार बंब, संदीप कोयटे, स्वाती संदीप कोयटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, राकेश न्याती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वाती कोळी म्हणाल्या की, समता स्कूलचे विद्यार्थी सलग तिसर्‍या वर्षी जिल्ह्यात प्रथम आले आहेत.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, सीबीएससी पॅटर्न इयत्ता दहावीच्या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रात समता इंटरनॅशनल स्कूल एक नवीन विक्रम केला आहे. संस्थेने शैक्षणिक कार्यावर विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक संगोपन, कौशल्य वाढीचे संस्कारासाठी उत्कृष्ट भोजन, व्यायामाची सुविधा, योग केंद्र, निवासी वसतिगृह, ऍक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग पॅटर्न आधुनिक सुविधा दिल्या आहेत. सन 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता 11 वी 12 वी ची विज्ञान शाखा सुरू करणार असल्याचेही सांगितले.