Breaking News

‘अहिंसानगर मार्ग’ नामकरणाची मागणी


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील शहरातील मुख्य कायनेटिक चौकातून अवतार मेहेरबाबा समाधी मार्ग, खाटिकखान्यातून सोडवलेली जनावरे जपणारी पांजरपोळ संस्था तसेच बडीसाजन श्री संघाचे भव्य मंगल कार्यालय याच मार्गावर होत आहे. त्यामुळे दौंडकडे जाणार्‍या या ‘कायनेटिक चौक ते कायनेटिक कंपनी’ या रस्त्याला ‘अहिंसानगर मार्ग’ नामकरण व्हावे अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांना नगरसेवक मीना चोपडा यांनी केली. 

मागणीचे निवेदन मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, बडीसाजन संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत धोका, वसंत लोढा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अजित कर्नावट, राजेंद्र गांधी, पांजरपोळ व्यवस्थापक महेश मुनोत, प्रकाश नहार, अनिल लुंकड, मिलींद जांगडा, राजेंद्र बोथरा, दीपक बोथरा आदी उपस्थित होते.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा घेऊन मनपाच्या माध्यमातून लवकरच योग्य कार्यवाही करून नामकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.