Breaking News

दौंड-उस्मानाबाद महामार्गाचे अर्धवट काम पुर्ण करण्याची मागणी


राशीन/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील राशीन मधून गेलेल्या दौंड-उस्मानाबाद राज्यमहामार्गाचे गेल्या सहा महिन्यापासून ठेकेदाराने अपुर्ण केलेले काम पुर्ण करण्याची मागणी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व भारतीय जनसंसद शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष जावेद काझी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, राशीन मधून गेलेला दौंड-उस्मानाबाद राज्यमार्ग गेल्या सात महिन्यापुर्वी काम सुरू करण्यात आले. पंरतु ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे. झालेल्या कामात बर्‍याच ठिकाणची रस्त्यावरची खडी उदसली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचा मुरूम काढल्याने तेथे खड्डे निर्माण झाले आहेत. साईडपट्टया व गटारी रस्ता करण्याआगोदर झाले नसल्याने हे काम कधी होणार असे नागरीक विचारणा करीत आहेत. 

संबधीत कामावर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या कामाला उशीर व निकृष्ठ झाल्याचे निवेदनात म्हणले आहे. अर्धवट स्थितीत असलेला राज्य मार्गाचे पावसाळा सुरू होण्यापुर्वी कार्पेट व सिलकोट होणे गरजेचे आहे, न झाल्यास रस्त्याची दुरावस्था होईल. त्यामुळे अपुर्ण काम लवकर सुरू करण्याची मागणी संघटनेच्यावतीने केली आहे. निवेदनावर जावेद काझी, इरफान काझी, राजेंद्र भागवत, कल्याण जंजीरे, राजेंद्र शिंदे आदींच्या सह्या आहेत.