Breaking News

बर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर हापसे


चांदे/प्रतिनिधी : नेवासे तालुक्यातील बर्‍हाणपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सत्ताधारी गटातील सदस्यांच्या सहमतीने विरोधी गटाचे मनोहर भाऊसाहेब हापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान उपसरपंच सचिन चव्हाण यांनी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर नुतन निवडीसाठी आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाच्या निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाचे एकूण आठ सदस्य आहेत. आणि विरोधी गटाचा एक सदस्य हापसे हे होते. आजच्या सभेत सत्ताधारी गटातील सदस्यांनी सहमती देत सर्वानुमते मनोहर हापसे यांना उपसरपंच देण्यास अनुमती दिल्याने हापसे यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेच्या अध्यक्षा सरपंच मंगल अर्जुन चव्हाण यांनी हापसे यांची बिनविरोध निवड जाहिर केली. 

ग्रामसेविका श्रीमती पाटोळे एस.बी. यांनी त्यांना सहकार्य केले. प्रा गणपतराव चव्हाण, छावाचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिन चव्हाण, शरद चव्हाण, घनश्याम चव्हाण, छाया अशोक चव्हाण, आशा भाऊसाहेब चव्हाण, ऊषा अविनाश विखे, नलिनी साहेबराव भारशकर, दिपक चव्हाण, आण्णासाहेब विखे, गोरख चव्हाण आदींनी प्रयत्न केले. यावेळी बाबासाहेब मरकड, सुभाष चव्हाण, नवनाथ विखे, कानिफ चव्हाण, रामकिसन तुपे, भाऊसाहेब भारशकर आदी उपस्थित होते.