Breaking News

समता इंटरनँशनल स्कूलचा १०० टक्के निकाल


कोपरगाव ता./ प्रतिनिधी : समता इंटरनॅशनल स्कूलचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १० वीचा (सीबीएसई) निकाल नुकताच जाहीर झाला. समता स्कूलने याही वर्षी१०० टक्के यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली. समता इंटरनॅशनल स्कूलने अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. एकूण विद्याथ्र्यांपैकी १५विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे. तसेच १०० पैकी १०० गुण मिळवून हिंदी आणि सामाजिक शास्त्र विषयामध्ये प्रथम येण्याचामान समता स्कूलने मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करताना संस्थापक ओम प्रकाश म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचेशिक्षण मिळावे हा समता स्कूलचा नेहमीच प्रयत्न असतो आणि या प्रयत्नात शिक्षक व सर्व समता स्कूलचे विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.