Breaking News

राहुल गांधींनी घेतली अल्वर गँगरेप पीडितेची भेट

राहुल गांधींनी साठी इमेज परिणाम

राजस्थान : अल्वर गँगरेप प्रकरणातील पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतली आहे. तसेच पीडितेला न्याय निश्‍चित होईल असे आश्‍वासन देत या मुद्द्याचं राजकारण करू नये असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. 26 एप्रिलला दुचाकीवर आपल्या पतीसोबत प्रवास करणार्‍या दलित महिलेला काही समाजकंटकांनी शेतात पळवून नेले. तिच्या पतीसमोरच या महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर या बलात्काराचे चित्रीकरणही करण्यात आले. जर महिलेने तोंड उघडलं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू असं म्हणत या दलित दाम्पत्याला दम भरण्यात आला. 30 एप्रिलला या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण याप्रकरणी 7 मेपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नाही असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला होता. याप्रकरणी राजस्थान सरकार हे प्रकरण दाबत असून दलित मुलीसोबत अन्याय करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तर गुन्हा 2 मेलाच दाखल करण्यात आला असून महिलेला नोकरी देण्यात येणार असल्याचं सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.