Breaking News

अगस्ती आश्रमात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा


अकोले/प्रतिनिधी: येथील अगस्ती आश्रमात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. एकाच मांडवाखाली सर्व धर्मीय मंत्र साधना करून अगस्ती आश्रमाच्या देवस्थान ट्रस्टने एक आदर्श पायंडा घालून दिला. त्यामुळे या विवाह सोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा झाली.

अगस्ती आश्रमामध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ११ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.विशेष बाब म्हणजे या विवाह सोहळ्यामध्ये नवबौद्ध समाजाचे २, महादेव कोळी समाजाचे ४, गुरव,बेलदार, ठाकर समाजाचे प्रत्येकी १ आणि मराठा समाजाचे २ असे मिळून अकरा विवाह पार पडले. वर आणि वधू यांच्या पसंतीनेच आणि संमतीने हे सर्व विवाह एका मांडवाखाली आणण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के. डी. धुमाळ,विश्वस्त गुलाबराव शेवाळे, परबत नाईकवाडी, संतू भरीतकर, अनिल गायकवाड, सतीश बूब, मारुती भिंगारे, देवस्थानचे सचिव सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसन शेठ लहामगे आदींनी परिश्रम घेतले.