Breaking News

राजेंद्र घाडगे यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकासकामांना निधी


मसूर / प्रतिनिधी : फत्यापुर, ता. सातारा गावचे सुपुत्र व जलसंधारण ओबीसी विकासमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ग्राम विकास पंचायत राज विभागातून जिल्ह्यातील दहा गावात विविध विकासकामांना 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा राजकारणविरहित केलेल्या घाडगे यांच्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे
याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील किवळ, चिखली, हेळगाव, पाडळी, हजारमाची, कोपर्डे हवेली या गावातील अंतर्गत रस्ते कामी प्रत्येकी सात लाख रुपये तसेच काशीळ तालुका सातारा सातारा येथील स्मशानभुमी दुरुस्तीसाठी सात लाख रुपये नांदगाव आणि फत्यापुर येथे सभामंडपास प्रत्येकी सात लाख रुपये कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

लवकर ही विकासकामे मार्गी लागणार आहेत. यापुर्वी ही राजेंद्र घाडगे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे अनेक वर्षापासून तांडावस्ती, वाड्यांचा विकास करण्यासाठी तांडावस्ती सुधार योजनेतून जिल्ह्यातील टिटवेवाडी, अतित, किरोली वाठार, नागझरी, अपशिंगे, नांदोशी, पळशी, चोराडे, लाडेगाव, पुसेसावळी या दहा गावात 85 लाखांचा निधी मिळवून देण्याबाबत त्यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.
याशिवाय पवारवाडी, तालुका खटाव येथे तलावासाठी 1 कोटी 20 लाख, फत्यापुर येथील दोन तलावासाठी 68 लाख, खबालवाडी येथे तलावासाठी 36 लाखाचा निधी देण्यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावाही केला आहे.
या कामांमुळे संबंधित विभागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.