Breaking News

रविवारी जगदंबा देवी यात्रा महोत्सव


सोनई/प्रतिनिधी : नेवासे तालुक्यातील सोनई येथील शनिशिंगणापूर रस्त्यावरील ग्रामदैवत जगदंवा देवी यात्रा सालाबादप्रमाणे रविवार दि.19 रोजी पार पडणार आहे. त्या निमित्ताने शनिवार दि.18 रोजी सायंकाळी 5 वा.प्रवरा संगम येथे गंगाजल आणण्यासाठी हॉटेल जनपथ येथून प्रस्थान होणार आहे. 19 रोजी सकाळी मारुती मंदिर या ठिकाणी गंगाजल कावडीचे आगमन होऊन भव्य स्वागत मिरवणूक जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या हस्ते करून जगदंबा देवीला गंगास्नान व चोळी पातळ अर्पण करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन मा.आ.शंकरराव गडाख, उदायन गडाख मित्र मंडळाच्यावतीने सरपंच दादासाहेब वैरागर, ग्रा.प.सदस्य मनोज वाघ, सुभाष निमसे, नितीन दरदले, शरद दरंदरले, भाना कुसळकर, मिठू आदमाने व ग्रामस्थांनी केले आहे.