Breaking News

संगमनेरात घरफोडी;तीन लाखांचा ऐवज लंपास


संगमनेर/प्रतिनिधी: दोन दिवसांपूर्वी संगमनेर बस स्थानक परिसरात भरदिवसा एका वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने ओरबाडून पोबारा केल्याची घटना ताजीअसताना आज पहाटेच्या सुमारास संगमनेर शहराजवळील सुकेवाडी शिवारातील एका घरातून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाची रोकड आणि सोन्या चांदीच्यादागिन्यांसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

शहर परिसरात वारंवार होणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटना बघता आता चोरट्यांना कायदाची व पोलिसांची भीती उरलीच नाही कि काय असा प्रश्न नागरिकउपस्थित करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सुकेवाडी येथे राहणाऱ्या रामनाथ बाळाजी कुटे (वय-५२) आणि त्यांची आई आपल्या घरात झोपले असताना पहाटेच्या सुमारासअज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कड्या तोडून आत प्रवेश केला आणि दुसऱ्या खोलीच्या कपाटात असलेली सुमारे २ लाख ५५ हजारांची रोख रक्कमआणि १ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे जोडवे अशा प्रकारचे मोल्यवान वस्तू घेऊन चोरट्याने पोबारा केला.सकाळी उठल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे कुटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. शहर पोलिसठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण करून त्यांच्या मदतीनेतपासकार्य पुढे नेण्यात आले. याप्रकरणी रामनाथ कुटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढीलतपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि. गोपाळ उंबरकर करीत आहे.