Breaking News

शिवम प्रतिष्ठानकडून कोकणगावला मोफत पाणीपुरवठा


कर्जत/प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील शिवम प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत टॅकरने पाणीपुरवठा सुरूकरण्यात आला. योजनेचा आरंभ जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला.

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून शासकीय यंत्रणाही कमी पडू लागल्याने शासनाच्या उपलब्ध टॅकरने काही गावाची तहान भागेना. यामुळेगावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ लागल्याने प्रतिष्ठानचे सचिव गंगाधर बोरूडे,अध्यक्ष रविंद्र बोरूडे व उपाध्यक्ष अभंग बोरूडे यांनीयातून काही तरी मार्ग काढला पाहिजे या विचारातून मंगळवारी मोफत टॅकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला यावेळी बिभिषण सुर्यवंशी,उपसरपंच तात्यासाहेब गवारे, मोहन गवारे, रघुनाथ गवारे, कल्याण गवारे, पंढरीनाथ गवारे, उमेश पाचपुते, संजय मापारी, बाबा गवारे, विकास तनपुरे, महिला वग्रामस्थ उपस्थित होते.