Breaking News

म्हसवडच्या चारा छावणीस जिल्हाधिकार्‍यांची भेट


सातारा / प्रतिनिधी : जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी आज माण तालुक्यातील म्हसवड येथील चारा छावणीस भेट देऊन चारा छावणीतील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जनावरांना चारा, पाणी, पेंड व्यवस्थित मिळतो का याची विचारपूस केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी रोज चारा छावणीस भेट देतात का, याबाबतही शेतकर्‍यांशी चर्चा केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. जिल्हाधिकार्‍यांसमवेत इतर अधिकारी उपस्थित होते.