Breaking News

सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन


सातारा / प्रतिनिधी : येत्या बुध्द पौर्णिमेला दि. 18 व दि. 19 मे या कालावधीत सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना अभयारण्यामध्ये विविध पाणवठ्यांवर निसर्गानुभव कार्यक्रम अशासकीय संस्था, व्यक्ती, निसर्गप्रेमी इ. साठी आयोजित केला आहे. इच्छुक संस्था व व्यक्तींनी नोंदणीसाठी 15 मे पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. विनीता व्यास उपसंचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराड यांनी केले आहे.

या कार्यक्रमाकरिता अशासकीय संस्था, व्यक्ती, निसर्गप्रेमी यांच्यासाठी पाणवठे निश्र्चितीकरण व वाटप करण्याचे सर्व अधिकार उपसंचालक यांचे राहतील, प्रत्येक पाणवठ्यावर दोन व्यक्तींची नेमणूक केली जाईल व त्याकरिता प्रती व्यक्ती रु. 600/- इतके प्रवेश शुल्क आकारले जाईल. तसेत वनपरिक्षेत कार्यालयात नियम व अटींचे पालक करण्याबाबतचे बंधपत्र लिहून घेतले जाईल. अटी व शर्तीचे पालन न केल्यास वन्यजीव (संरक्षण )अधिनिय 1972 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपसंचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराड सह्याद्री भवन, त्रिमुर्तीकॉलनी, आगाशिवनगर, पो. मलकापूर ता.कराड जि. सातारा (दूरध्वनी क्र. 02164- 241711 ई मेल - ववीींीज्ञरीरवसारळश्र.लेा) यांचेशी संपर्क साधावा.