Breaking News

तलावातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची मागणी


जामखेड ता./प्रतिनिधी: जामखेडसाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव संपूर्णपणे कोरडा झाल्याने गाळ काढण्याची संधी आहे. जैन संघटना आणि कोठारी प्रतिष्ठानमार्फत यातील गाळ मोफत काढला जाणार असून या कमी प्रशासनाने सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी , तालुका प्रकल्प संचालक प्रफुल्ल सोळंकी, प्रशांत बोरा ,अमोल तातेड ,नितीन सोळंकी , मनोज भंडारी , संजय गांधी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात भारतीय जैन संघटनेनार्फत तलावातील गाळ मोफत काढून दिला जाणार असून शेतकऱ्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणून तो भरून घेऊन जावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदारांनी मागील तीन वर्षांपूर्वी तलावाचा गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली होती. तसेच तालुक्यातील मोहरी तलावतील गाळ काढल्यामुळे आज त्या तलावातून जामखेड तालुक्याला व शहराला टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. वरिष्ठांशी चर्चा करून ताबडतोब परवानगी देऊन गाळ काढण्यास सुरुवात करू असे आश्वासन दिले.