Breaking News

कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण


सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून अचानक कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढले आहे . मोबाइल कंपनीकडे वारंवार तक्रार देऊनही काहीच फरक पडत नसल्याने मोबाइलधारक वैतागले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांना आठ दिवसात कंपन्यानी सेवा सुधारली नाही तर आंदोलन करू असे इशारा देणारे निवेदन सादर केले आहे . निवेदनात नमूद आहे की चालू कॉल खंडित होणे, मोबाइल लागूनही पलीकडच्याचा आवाज न होणे, अशा तक्रारी सातार्‍यात सर्रास वाढलेल्या असताना कंपन्या मात्र मोबाइल धारकांना सरसकट बिले लावत आहेत. 

सदर बिलाची वसुली ही बेकायदेशीर असून हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे .