Breaking News

आजी-माजी नगरसेवकांवर गुन्हा

गुन्हा साठी इमेज परिणाम

अहमदनगर /प्रतिनिधी : शहरातील सर्जेपुरा चौकात बुधवारी सायंकाळी केलेल्या दगडफेकप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. आजी-माजी नगरसेवकांसह 100 जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेचे नगरसेवक मुदस्सर शेख (बहुजन समाज पक्ष) आणि माजी नगरसेवक आरिफ शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्यासह 100 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. या दंगा आणि दगडफेकीत चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शम्मा याकुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक आरिफ शेख याच्यासह 36 जणांविरुद्ध तर सद्दाम गफूर शेख याच्या फिर्यादीनुसार नगरसेवक मुदस्सर शेख याच्यासह 22 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली.
तोफखाना पोलिसांनी स्वतंत्र आणखी एक सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे.
पोलीस नाईक विकास खंडागळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार नगरसेवक मुदस्सर शेख आणि माजी नगरसेवक आरिफ शेख याच्यासह 42 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तोफखाना पोलिस गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. त्यानुसार अटकेसाठी गोपनीय पद्धतीने छापासत्राचे नियोजन केले आहे.