Breaking News

ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर साठी इमेज परिणाम
अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने नगर तालुक्यातील माहे जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत  मुदत संपणार्‍या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व  दिनांक 31 मार्च पर्यत अनर्हता, राजीनामा, मयत या कारणांमुळे ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी  निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दि. 13 मे रोजी प्रारुप मतदार यादी  प्रसिध्द करण्यात आली. या यादी संदर्भात हरकती  दि. 16 मे पर्यत दाखल करण्यात याव्यात.  त्यानंतर दिनांक 20 मे रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे तहसीलदारांनी    कळविले.