Breaking News

श्रीगोंदे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य


श्रीगोंदे/प्रतिनिधी तालुक्यातील जिरायत कोळगाव, भानगाव, मांडवगण भागा बरोबरच घोड, कुकडी लाभक्षेत्रातील अनेक गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. दुष्काळ निवारणासाठी 68 पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही टँकर बाबत ओरड सुरू आहे. 

तालुक्यामध्ये टँकर फिरत असताना लाँगबुक जवळ नसणे, फेर्‍या अनियमित, उद्भव सोडून जवळून पाणी आणणे, त्यातच पाणी गढूळ आहे, त्यामुळे लोक ते पाणी पीत नाही, अन्य कामासाठी वापरतात. यावर महसुलचे नियंत्रण नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसले. तसेच छावणी बाबतही जाचक अटी मुळे छावणी चालक व शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, जनावरांना बिल्ले, अपुरा 15 किलो चारा, शिवाय मोठा दंड यामुळे चालक धास्तावले आहेत. कडक नियमामुळे गैरव्यवहार नसताना घुटेवाडी भागात तपासणीच्या नावाखाली 5 हजार रुपये मगितल्याचा आरोप होत आहे. अनुदान अडकल्याने व दुसरीकडे कारवाईची भीतीमुळे छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. शेतकरी 44 अंश तापमानात छावणीला दिवसभर थांबला आहे. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मागत आहे. संबंधित अधिकारी न्याय देईल का हे येत्या दिवसात कळेल, शिवाय तक्रारी वर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.