Breaking News

राज्य सरकारविरोधात प्राध्यापकांचा मनमानीचा सूर
सोलापूर : यूजीसीने दिलेल्या योजनेत राज्य सरकारने मनमानी पद्धतीने अटी टाकत बदल केल्याने राज्यातील प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून एम. फुक्टो या प्राध्यापकांच्या शिखर संघटनेने आता आंदोलनाचा पवित्रा घेत राज्य शासनाच्या धोरणाला विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन राज्य शासनाला दिल्याची माहिती एम.फुक्टोचे पदाधिकारी डॉ. हनुमंत आवताडे यांनी दिली. 

उच्च शिक्षण विभागाने 10 मे 2019 रोजी काढलेल्या जीआरनुसार ज्या सहायक प्राध्यापकांचे असोसिएट प्रोफेसर साठीचा कालावधी पूर्ण झाला, अशा सहायक प्राध्यापकांचे आता वेतन निश्‍चिती व पदोन्नती ज्या दिवशी कॅस प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्या दिवशीपासून पदोन्नती गृहीत धरले जाईल, असे म्हटले आहे. यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2018 पर्यंत शिथील होती. आता या प्राध्यापकांना बॅक इफेक्ट म्हणजे त्यांच्या ड्यू डेट नुसार पदोन्नतीचे लाभ मिळणार नाहीत. ज्या दिवशी कॅसची प्रक्रिया पूर्ण झाली त्या दिवसापासून असोसिएट प्रोफेसर पदाचे लाभ त्यांना मिळतील.