Breaking News

‘हल्दीराम’ रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात आढळली मृत पाल

Image result for ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात आढळली मृत पाल

नागपूर : येथील प्रसिद्ध ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात मृत पालीचे पिल्लू आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने हल्दीरामच्या स्वयंपाक घराला टाळा ठोकला आहे. खाद्य पदार्थात मृत पालीचे पिल्लू आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मेंदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये हे मृत पिल्लू सापडले होते.

हे मृत पिल्लू बघताच खाणार्‍या दोघी जण बेशूद्ध झाले. त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.


वर्धाचे रहिवासी यश अग्निहोत्री हे नागपूरला गेले होते. त्यावेळी नागपूर येथील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये ते आपल्या कुटुंबासोबत गेले. यावेळी त्यांनी मेंदूवडा मागवला. या मेंदूवडा आणि साभारमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळले. हे पाहताच क्षणी दोव्ही जण बेशूद्ध झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर अग्नीहोत्री यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार केली. या तक्रारीनंतर एफडीएने केलेल्या तपासणीत हल्दीरामच्या स्वयंपाक घरात अस्वच्छता आढळली. त्यामुळे एफडीएने हल्दीरामच्या स्वयंपाकघराला टाळा ठोकला. यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाचे नागपूर सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे म्हणाले की, या घटनेबद्दल बुधवारी सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तातडीने हल्दीरामच्या रेस्टॉरंटची पाहणी केली. तेव्हा स्वयंपाकघराच्या खिडकींना जाळी लावण्यात आली नव्हती. याशिवाय, कायदेशीरपणे स्वच्छता नव्हती. त्यामुळे तिथे योग्य त्या प्रकारची स्वच्छता होत नाही, तोपर्यंत परवानगी दिली जाणार आहेय