Breaking News

आईवरच अत्याचार; वाई तालुक्यातील घटनाभुईंज / वार्ताहर : वाई तालुक्यातील एका गावात गुरुवारी रात्री मुलानेच आईवर अत्याचार केल्याची चीड आणणारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भुईंज पोलिस ठाण्यात या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, या घटनेने नात्याला काळीमा फासला गेल्याने संशयितांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
 
याबाबत   पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील पीडित महिला तिच्या पतीसोबत एका लग्नाचा कार्यक्रम असल्याने तिकडे गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर महिला एकटीच घरी पुढे आली. यावेळी तिचा मुलगा हा घराच्या ओट्यावर बसला होता. संशयिताची आई घरात गेल्यानंतर तिचा मुलगा ही घरात गेला व त्याने आतून कढी लावली. यावेळी त्याने  जबरदस्ती करत स्वत:च्या आईवर बलात्कार केला. यावेळी आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरातील शेजारी तेथे जमा झाली. यानंतर शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती संशयिताच्या वडिलांना दिली. त्याच्या वडिलांनी मुलाला केल्या कृत्याचा जाब विचारून यामध्ये हस्तक्षेप केला असता मुलाने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. 
 
घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेतली. स्वत:च्या मुलानेच केलेल्या या घृणास्पद कृत्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. हे ऐकून पोलिस ही हादरून गेले. दरम्यान, या घटनेनंतर संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.