Breaking News

लग्न केले, तरच मायावतींना मोदींबाबत बोलण्याचा अधिकारः आठवले

Image result for आठवलेलखनऊः मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करीत आहेत; मात्र मायावतींनी लग्न केले नाही. त्यामुळे कुटुंब काय असते, हे त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल, असा उपरोधिक सल्ला मायावतींना देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मोदी यांची पाठराखण केली. मायावती यांनी लग्न केले, तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असेही आठवले यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.
राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या पत्नीला सोडले, ते महिलांचा सन्मान कसा करणार, असा प्रश्‍न विचारत मायावती यांनी मोदी यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला आठवले यांनी उत्तर दिले आहे. मोदी यांचे लग्न झाले आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावती यांनी मोदी यांच्यावर व्यक्तीगत टीका करायला नको होती असेही आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा मुद्दा प्रचाराच्या अग्रस्थानी होता. योगगुरू रामदेव बाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातून काळा पैसा आणू शकतील, असा दावा करून त्यांना निवडून देण्याचे आवाहन करीत होते. लोकसभेच्या या निवडणुकीत काळ्या पैशाच्या मुद्द्याला कुणीच हात घातला नाही. मोदी यांना त्यांच्या आश्‍वासनांची आठवण करून दिली नाही. रामदेवबाबांचा तर काळा पैसा परदेशातून आणण्याच्या आश्‍वासनावर भ्रमनिरास झाला. त्यामुळे ते काहीच बोलायला तयार नाही.