Breaking News

टेम्पो व टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

धडकेत साठी इमेज परिणाम
संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावरील अपघाताची मालिका अद्याप थांबण्यास तयार नाहीबुधवारी टेम्पो आणि पाण्याच्या रिकाम्याटँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू झालातर तिघे जखमी झालेजखमींवर उपचार सुरु आहेतबाह्यवळण मार्गावरील मार्गावरील मालपाणी चौफुलीजवळ हा अपघातझाला.
बाह्यवळण मार्गावरील हे ठिकाण अपघातस्थळ बनले असून आत्तापर्यत येथे अनेकांचे बळी गेले.
विनोदकुमार सोनकर (वय ३०असे अपघातातील मृत टेम्पोचालकाचे नाव आहेठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हे बळी जात आहेतठेकेदार कंपनीने याठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे काम  केल्याने हा मार्ग अनेकांसाठी मृत्यूघंटा ठरला आहेबुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नाशिककडून संगमनेरच्यादिशेने वळण घेत असलेल्या पाण्याच्या रिकाम्या टँकरला (एमएच४३ वाय २९३१पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्याटेंम्पोने (एमएच ०४ एचएस १०९६जोराची धडक दिलीही धडक इतकी भयानक होती की वळण घेणारा टँकर जागेवरच पलटी झालातर टेंम्पोच्या केबिनचाचक्काचुर झालायात चालक आणि क्लिनर अडकून पडले होतेनागरिकांनी या दोघाही जखमींना टेम्पोच्या काचा फोडून बाहेर काढले आणि रुग्णालयामध्येहलविलेउपचारादरम्यान चालक विनोदकुमार सोनकर (रामुंबईयाचा मृत्यू झालाटँकरचालकही किरकोळ जखमी झालायासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्याचे काम सुरु होते.