Breaking News

कोलकात्यात डाव्या पक्षांचा मोर्चा

कोलकात्यात डाव्या पक्षांचा मोर्चा साठी इमेज परिणाम
कोलकात्ताः कोलकातामध्ये मंगळवारी सायंकाळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारानंतर काही जणांकडून ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. या कृत्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वात कोलकात्यात मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
या वेळी येचुरी यांनी कोलकत्यात असे कसे काय घडू शकते, याचा शोध घेण्यासाठी या घटनेचा तपास झाला पाहिजे, असे म्हटले. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनेदेखील ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीचा निषेध व्यक्त केला.