Breaking News

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात


संगमनेर/प्रतिनिधी: मालपाणी उद्योग समूह आणि परिवाराने मागील वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अबाधित ठेवत तब्बल ४८ सर्वधर्मीय नवदांपत्यांचा विवाह सोहळा काल मंगळवार दि.०७ रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर याथाचीत्त पार पडला. यावर्षी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात ४२ हिंदू, ५ बौद्ध आणि एका मुस्लीम वधू वर जोडप्यांनी आयुष्याची लग्नगाठ बांधली.

यावेळी मालपाणी उद्योग समूहाच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्य ललितादेवी व सुवर्णा मालपाणी यांच्यासह राजेश, डॉ.संजय, मनिष, गिरीष, हर्षवर्धन, जयवर्धन व मालपाणी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने एकवीस हजार रुपयांच्या भेटवस्तू दिल्या.