Breaking News

एक्झिट पोलशी संबंधित सर्व ट्विट हटवा निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Image result for निवडणूक आयोगाचे
नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. आता फक्त शेवटचा अर्थात सातव्या टप्प्याचे मतदान शिल्लक राहिले आहे. दरम्यान, या सहा टप्प्यानंतर देशात कोण जिंकणार यावर जोमात चर्चा सुरु आहे. देशातील गावा-गावांत, चावडीवर कोण जिंकणार हीच चर्चा रंगली आहे. ही चर्चा फक्त गाव, शहर पुरता न मर्यादित राहता सोशल मीडियावर देखील आहे. या चर्चेसंदर्भात ट्विटरवर प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यामुळे एक टप्पा बाकी असताना एक्झिट पोलचे ट्विट दिसणे, हे लोकशाहीच्या हिताचे नाही म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला एक्झिट पोलशी संबंधित सर्व ट्विट हटवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भात ट्विटर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 19 मे रोजी निवडणूकीचा शेवटचा टप्पा होणार असून याच दिवशी एक्झिट पोल जाहिर करण्यात येणार आहे. एक्झीट, पोल, ट्विट, निवडणूक, आयोग, ट्विटर, आदेश,निवडणूक आयोगनिवडणूक आयोगाकडे एक्झिट पोल संदर्भात तीन मीडिया हाऊस विरोधात तक्रारी आल्या होत्या. यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. तसेच या मीडिया हाऊस विरोधात कारवाई का करु नये याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे.