Breaking News

मसूर येथे शनिवारी मोफत कॅन्सर जनजागृती व्याख्यान व शिबीर


मसूर / वार्ताहर : येथील स्व.हिंमतलाल चतुरलाल शहा, स्व. सरला हिंमतलाल शहा व स्व.अनिता महेंद्रकुमार शहा यांचे स्मरणार्थ शनिवार दिनांक 11 मे 2019 रोजी सकाळी 11 वा.रायचंद भोजराज मंगल कार्यालय मसूर येथे प्रसिद्ध डॉक्टर सुरेश भोसले यांचे कॅन्सर या रोगाविषयी जनजागृती व्याख्यान तसेच हृदयविकार, मधुमेह व कर्करोग मोफत तपासणी शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती निमंत्रक महेंद्रकुमार शहा व अतुलकुमार शहा यांनी दिली. 
 
या दिवशी हृदयविकार, मधुमेह व कर्करोग मोफत तपासणी शिबीर स.11 ते सांय 6 या वेळेत संपन्न होणार आहे. याचदिवशी भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. 
 
शिबिर यशस्वी करण्यासाठी कृष्णा चारीटेबल ट्रस्ट कराड, ग्रामपंचायत मसूर, प्राथमिक आरोग्य केंद्र मसूर, श्री साचादेव सुमतिनाथ जैन संघ मसूर, लायन्स क्लब मसूर, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ मसूर, सर्व गणेश व नवरात्र उत्सव मंडळ मसूर , रोटरी अँड रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड व महालक्ष्मी ब्लड बँक कराड या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. मसूर व पंचक्रोशीतील तमाम लोकांनी या कॅन्सर विषयी जनजागृती व्याख्यानाचा तसेच हृदयविकार, मधुमेह व कर्करोग मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रद्धा ट्रेडर्स तथा श्रद्धा ऍग्रो मार्टचे महेंद्रकुमार शहा व श्रद्धा सेल्सचे अतुल शहा यांनी केले आहे.