Breaking News

आदित्य पांचोली विरोधात बलात्काराची तक्रार

आदित्य पांचोली साठी इमेज परिणाम

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वतीने तिच्या बहिणीने ई-मेलद्वारे ही तक्रार दाखल केली आहे. मात्र आदित्य पांचोलीने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. 13 वर्षापूर्वीचे हे प्रकरण असून त्यावेळी आदित्य पांचोली आणि संबधित अभिनेत्री यांचे एकमेकांशी चांगले संबध होते.
मला फसवलं जात असल्याचे आदित्य पांचोलीने म्हटले आहे. आदित्य पांचोलीने या अभिनेत्रीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हीच मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिचे वकील रिजवान सिद्दीकींना 6 जानेवारी 2019 भेटीसाठी आपल्या घरी पाठवल होते. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असा दावा आदित्य पांचोलीने केला. आदित्य पांचोलीविरोधात या अभिनेत्रीने विविध चॅनेल्सवर गंभीर आरोप करत होती. मात्र ते आरोप मान्य नसल्याने आदित्य पांचोलीने तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर रिजवान सिद्दीकीमार्फत तिने माझ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आदित्य पांचोलीने केला.
वकील रिजवान सिद्दीकी आणि माझ्यात झालेल्या चर्चेचे मी स्टिंग ऑपरेशन केले आहे. या स्टिंग ऑपरेशनचा 18 मिनिटांचा व्हिडीओ वर्सोवा पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त आणि अंधेरी मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट यांना सोपवला आहे. या व्हिडीओची सत्यताही पडताळण्यात आलेली आहे, असे आदित्य पांचोलीने सांगितले.