Breaking News

शेवगावमध्ये तरुणांचा अगळा-वेगळा उपक्रम


शेवगाव श/प्रतिनिधी : शेवगाव परिसरातील सातत्याने होणारी वृक्षतोड या विषयावर मात करण्यासाठी शेवगाव येथील समविचारी तरुण व तरुणांनी एक अगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. माघील चार वर्षांपूर्वी शेवगाव परिसरातील दिपक, तागड, संदीप सातपुते यांनी एकत्र येवून ऊर्जा फाउंडेशनची स्थापना केली. आतापर्यंत ऊर्जा फाउंडेशने शेवगाव-पाथर्डी तसेच आष्टी तालुक्यतील तारकेश्‍वर गड अशा अनेक विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. 

तसेच शेवगाव-वरूर रोड येथे जवळपास 1500 वृक्षांची लागवड करुन त्याचे संगोपनही ही संस्था करत आहे. या झाडांना पोटच्या लेकरसारखं जपत आली आहेत. यांच्या वाढीसाठी सातत्याने पाणी देण्याचे कार्य आठवड्याच्या प्रत्येक रविवारी हे करत आहे. तसेच समाजातील जागृत व्यक्तींनी व पर्यावरण प्रेमींनी या कार्यात सहभागी व्हावे, व ह्या सामाजिक कार्यास आर्थिक मदतीचे आव्हानही ऊर्जा फाउंडेशनद्वारे करण्यात आले. या सामाजिक कार्यात गौरव जाजू, तुषार दहिवाळ, प्रवीण लाहोटी, सचिन बंब, संग्राम कोपरगे, मधुर पलोड, तेजस आदमाने, ओंकार भाडईत तसेच संकल्प अकॅडमीचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांचा सहभाग आहे.