Breaking News

अनधिकृतपणे पाण्याचा उपसा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


राहता/प्रतिनिधी: गोदावरी उजवा कालवा शाखा सोमठाणा येथे कॅनॉलमधून अनधिकृतपणे पाइपने पाणी उपसा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध पाणी चोरीचा गुन्हा दाखल. 

याबाबत सिन्नर तालुक्यामधील मुसळवाडी पोलिस ठाण्यात कलम 379 प्रमाणे पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सोमठाणा हद्दीमध्ये जलसंपदा विभागाचे कॅनॉल इन्स्पेक्टर भाऊसाहेब मेहेत्रे, विजय ठोंबरे, शाखाधिकारी ओंकार भंडारी त्यांच्या सहकार्‍यांबरोबर कॅनॉलची पेट्रोलिंग करीत असताना सोमठाणा हद्दीत कॅनॉल फोडून त्या ठिकाणी पाईप टाकून पिण्यासाठी सोडलेल्या सोडण्यात आलेल्या अवर्तना मधून शेतीसाठी पाणी उपसा करीत असणार्‍या सात व्यक्तींविरुद्ध पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सातही व्यक्ती सोमठाणा शिवारातील आहे. त्यांची नावे त्र्यंबक सुखदेव घुमरे, माणिक वेणुनाथ कोकाटे, संतोष बाळानाथ घुमरे, दत्तू श्रीपत धोकरट, सागर कचरू कोकाटे, रविंद्र काशिनाथ कोकाटे, विनायक साहेबराव कोकाटे अशी आहे. या सात जणांविरुद्ध अनधिकृतपणे पिण्याचे पाणी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धारणा व गंगापूर धरणातून गोदावरी उजवा कालव्यातू सोमठाणा, कोळगाव, हरी संच ब्रांच, शिर्डी, राहाता, चितळी या जलसंपदा विभागाच्या शाखेद्वारे गावांना पिण्याचे पाणी पुरवण्याच्या करण्याचे काम सध्या 110 किलोमीट हेट टू टेल या अंतरावर होत आहे. पिण्याचे पाणी आवर्तन दोन दिवसापासून सोडण्यात आले आहे. सध्या दुष्काळ परिस्थिती सामना सर्व नागरिकांना करावा लागत आहे. प्रत्येक गावांचे पिण्याचे साठवण तलाव कोरडे झाले. प्रत्येक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक दिवसापासून शिर्डी कोपरगाव राहाता या मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना 15 ते 20 दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. 

पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ नये, यासाठी गोदावरी कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पिण्याची पाणी चोरी होऊ नये, यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकारी कर्मचारी हे दक्षता घेत आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पाईप टाकून नागरिक शेतीसाठी पाणी उपसा करीत आहे. गोदावरी कालव्यात सोडण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्यातून निम्मे पाणी अनधिकृतपणे पाईप उचलली जाते. त्यामुळे पिण्याचे पाणी आवर्तन हे प्रत्येक गावाला मिळते की, नाही उपअभियंता एस जी गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमठाणा येथील कालवा निरीक्षक भाऊसाहेब मेहेत्रे यांनी त्यांच्या सहकार्‍यांनी बरोबर घेऊन सोमठाणा हद्दीत पाणीचोरी कशी थांबवता येईल, यासाठी काळजी घेतली आहे.