Breaking News

अभिषेक महाजन यांची कर सहायकपदी निवड


कोळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत अभिषेक दिलीप महाजन यांची सलग दोन परीक्षेत निवड झाली. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. सन 2018 साली लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत अभिषेक दिलीप महाजन यांनी गट क वर्ग मंत्रालय लिपिक आणि गट क वर्ग कर सहायक विक्रीकर विभाग या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाले. अभिषेक दिलीप महाजन हे अहमदनगरचे माजी उपजिल्हाधिकारी स्व.दिलीप महाजन यांचे चिरंजीव तर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी महाजन यांचे मेहुने आहेत.त्यांच्या चिकाटीने अभ्यास जिद्द, मेहनत, प्रचंड आत्मविश्‍वास यामुळे सदरील यश मिळाले आहे. या यशा बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.