Breaking News

टाळगांवला विश्वकर्मा महासंघातर्फे टँकर पुरवठा


वडूज / प्रतिनिधी : खटाव-माणसह जिल्ह्याच्या अनेक भागात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळी परस्थितीत पाणी व जनावरांचा चारा उपलब्ध करण्यासंदर्भात शासन पातळीवरही उपाययोजना होत आहेत. शासन यंत्रणेस हातभार म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना पुढे येत आहेत.

कुंभारगांव (ता. पाटण) येथील विश्वकर्मा प्रतिष्ठान व अखिल महाराष्ट्र सुतार समाज महासंघाच्या वतीने कराड तालुक्यातील टाळगांव मधील शेवाळेवाडी भागास टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तंत्र विज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंगबाबा पाटील यांच्याहस्ते या टँकर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रदेश चिटणीस मोहन सुतार, संघटक भगवान सुतार, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुतार, अजित सुतार, सुनिल धर्माधिकारी, प्रदिप सुतार, तानाजी सुतार, नितीन पोतदार, संदिप पोतदार, अनिल सुतार, विनायक ह. सुतार, सचिन सुतार, विलास सुतार, मच्छिंद्र सुतार, शालीवहन सुतार, कौस्तुभ सुतार, प्रवीण सुतार, गोपाळ सुतार, प्रशांत सुतार, जे. पी. सुतार, वसंत सुतार, ऋतुराज सुतार आदी उपस्थित होते. वरील गावास आठवड्यातून दोनवेळा पिण्याच्या पाण्याचा टँकर पुरवठा होणार आहे.