Breaking News

ममता बॅनर्जी मला पंतप्रधान मानत नाही : मोदी

मोदी साठी इमेज परिणाम

मऊ (उत्तर प्रदेश) : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला आपला पंतप्रधान समजत नसून त्या पाकिस्तानी पंतप्रधानांना आपला पंतप्रधान समजत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जीवर टीका करताना म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशातील मऊ येथील प्रचारसभेत बोलत होते. जे लोक ‘मोदी हटाओ’चा नारा देत आहे त्यातून त्यांची निराशाच झळकत असल्याचे ते म्हणाले.
विरोधकांचा माझ्याबाबत अपशब्दांचा भडिमार दिवसागणिक वाढत जात आहे. ममता मला पंतप्रधान मानत नाही. तर त्यांना वाटत कि त्यांचे पंतप्रधान पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. मी आजच पश्‍चिम बंगालमध्ये जात आहे आणि संपूर्ण देशाला सांगणार आहे कि तिथे कशा प्रकारची बेबंदशाही माजली आहे. मोदी म्हणाले दीदी जर मार्गात आल्या असत्या तर त्यानी माझे हेलिकॉप्टर उतरायला किंवा रॅली करायला परवानगी दिली नसती. त्यांचे पक्ष कार्यकर्ते माझ्या रोड शोच्या दरम्यान अडथळे आणतील. त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोत अडथळे आणले आणले ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. सपा-बसपा आघाडीवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, ही संधीसाधू आघाडी आहे जी लखनौच्या वातानुकुलीत खोलीत तयार झाली. हे नेते जमिनी वास्तविकतेपासून पूर्णपणे तुटले असून पक्ष कार्यकर्त्यांना विसरले आहेत. देशाला माहित आहे कि मोदी हटाओ केवळ बहाना आहे. त्यांचा मुख्य हेतू त्यांना त्यांचा भ्रष्टाचार लपवायचा आहे. जे 8 किंवा 10 जागा जिंकण्याची आशा ठेवतात. ते पंतप्रधान होऊ पाहात आहे. परंतु त्यांना माहित नाही कि देशाने ठरविले आहे कि फिर एक बार मोदी सरकार.