Breaking News

उद्यापासून लांडेवाडीत पारायण सोहळा


सोनई/प्रतिनिधी: नेवासे तालुक्यातील लांडेवाडी येथील वै. ह.भ.प.बालब्रह्मचारी माधावबाबा लांडेवाडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दि.११ मे ते १८ मे पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेवेकरी ह.भ.प.देवराव बाबा लांडेवाडीकर व गावकरी भजनी मंडळाने ही माहिती दिली.

दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते६ काकडा ,सकाळी ७ ते ११ ग्रंथराज पारायण ,सायंकाळी ४ ते ५ प्रवचन ,सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ ,रात्री ८. ३० ते १०. ३० हरिकीर्तन समावेश आहे. किर्तन सोहळ्यात ह.भ.प.राम महाराज बोचरे,ज्ञानेश्वर महाराज पवने, वेणूनाथ महाराज वेताळ,रामेश्वर महाराज कंठाले, भगवान महाराज जगले,शिवाजी महाराज देशमुख, बालयोगी ऋषिकेश महाराज वाकचौरे आदी कीर्तनरूपी सेवा देणार आहेत. शनिवार दि.१८ रोजी सकाळी ८ ते १० ह भ प पांडुरंग महाराज गिरी ( वावीकर) यांचे कल्याच्या किर्तनाने होऊन महाप्रसाद वाटपाने सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ह.भ.प.देवराव बाबा लांडेवाडीकर, गुरुवर्य माधावबाबा भक्त मंडळ, शिष्य मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.