Breaking News

लग्न सोहळ्यात सामाजिक उपक्रम राबवत केले सायकल वाटप


पारनेर/प्रतिनिधी: निघोज येथे मुंबई येथील व्यवसायीक सुरेश रामचंद्र ढवण, सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रा.सदस्य दिलीप ढवण, रमेश ढवण या परिवाराने गुलाब शिकारे यांची मुलगी तसेच सुरेश ढवण यांची मानसकन्या असलेल्या पुजा हीच्या लग्नात शाळेला पायी जाणार्‍या कुणाल संतोष बोर्‍हाडे याला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. 

तसेच ढवणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला तीन हजार रुपयांची देणगी विजय औटी यांच्या हस्ते स्कूल कमीटीचे अध्यक्ष रंगनाथ पाटील ढवण यांच्याकडे देण्यात आली. ढवण परिवार हा सामाजिक कार्यक्रमात सातत्याने सहभागी असतो. अक्कलवाडी येथील गुलाब शिकारे यांची कन्या पुजा ही मुंबई येथील व्यवसायीक सुरेश रामचंद्र ढवण यांची कन्या आहे.तीचा विवाह दादाभाऊ पावडे यांचे चिरंजीव सचिन यांच्याबरोबर निघोज येथील कपिलेश्‍वर मंगल कार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाला. मुलीचा विवाह तर पिता थाटातच संपन्न करतो. मात्र, सुरेश रामचंद्र ढवण यांनी मानसकन्या असलेल्या पुजा हिचा विवाह थाटामाटात संपन्न केला.

 या विवाहात सत्काराला फाटा देऊन सुरेश ढवण यांनी पाच किलोमीटर पायी चालत जाऊन शाळेला जाणार्‍या कुणाल संतोष बोर्‍हाडे याला आठ हजार रुपयांची सायकल तसेच शाळेच्या विकासासाठी तीन हजार रुपये भेट दऊन खरे सामाजिक काम केले असल्याने उपस्थितांनी सुरेश ढवण व परिवाराचे कौतुक केले आहे. तसेच ढवण यांचे पिताश्री व मातोश्री यांच्या वयाला 71 वर्षे व मातोश्रींच्या वयाला 65 वर्षे पुर्ण होत असल्याबद्दल दि. 20 मे रोजी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा होत आहे.