Breaking News

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात


श्रीगोंदे/प्रतिनिधी :छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. येथील छत्रपती संभाजी राजे चौकात आयोजित या कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक उपक्रम घेत कार्यक्रम पार पडला. संभाजी माहाराजांवरील पुस्तके वाटण्यात आली. त्याच बरोबर चौक स्वछता तसेच रूपाली औटी हीच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत यावेळी गोळा करण्यात आली.

बाल व्याख्याते धीरज हरिभाऊ शिंदे यांनी यावेळी व्याख्यान करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमासाठी राजेंद्र नागवड़े, वैभव पाचपुते, मनोहर पोटे, अड संभाजी बोरुड़े, प्रशांत गोरे, संतोष कोथींबिरे, सतीश मखरे, विजय गायकवाड़, भीमराव कोथिंबिरे, सतीश शिंदे, दत्ताजी जगताप, राजकुमार पाटिल, संजय सावंत, सतीश कसरे, गोरख उंडे, अक्षय ससाने, चंद्रकांत कटारिया, संदीप उमाप, सूरज घोड़के आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर पोटे यांनी संभाजी राजे चौकात संभाजी महाराजांचे मोठे शिल्प लवकरच उभे करू असे आश्‍वासन यावेळी दिले. तसेच वैभव पाचपुते यांनी मांडवगण येथील उपबाजारास छत्रपती संभाजी महाराज उप बाजार असे नाव देण्याचे जहीर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल ढवळे, सतीष बोरुड़े, नानासाहेब शिंदे, गणेश पारे, मयुर आढाव, सूरज शिंदे, धीरज शिंदे, सचिन जंगले, इरफ़ान शेख, प्रविण काळे, मंगेश जंजिरे, अमोल वड़वकर, महेश बोत्रे, अक्षय बोत्रे, अक्षय ससाने, मंगेश लोखंडे, गणेश ससाने यांनी परिश्रम घेतले.