Breaking News

मोबाईलचे दुकान फोडले


संगमनेर/प्रतिनिधी: नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा शिवारात मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी सहावाजता उघडकीस आली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सुखदेव गाडेकर रा.आंबी खालसा ता.संगमनेर यांची आंबी खालसा शिवारातनाशिक पुणे महामार्गालगत सद्गुरू मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि तेघरी गेले. मध्यरात्री नंतर चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले जुने मोबाईल,एलईडी बल्ब, हेडफोन व चार्जर असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी राजेंद्र गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचागुन्हा दाखल करण्यात आला आहे.