Breaking News

शेवगाव येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात


शेवगाव/प्रतिनिधी: शेवगाव येथे भगवान परशुराम जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बालाजी मंदिर येथून भगवान परशुरामाच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तेथून मिरवणूक क्रांती चौकातील गणपती मंदिर येथे आल्यानंतर त्याठिकाणी महाआरती व प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शेवगाव तालुका ब्राह्मण सभा, परशुराम सेवा संघ, बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूकीला विशेष शोभा आली होती. बालाजी मंदिर येथे मिरवणूकीची समाप्ती करण्यात आली. त्याठिकाणी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विजय जोशी, राधेश्याम तिवारी, दिलीप मुळे, गणेश देशपांडे, योगेश तांबोळी, विष्णुपंत भालेराव आदींची भाषणे झाली. यावेळी श्याम मुळे, अनंत मुळे, महेंद्र मुळे, वसंत मुळे, डॉ.अभय देशपांडे, मंदार मुळे, मयूर मुळे, अरुण गालफाडे, प्रसाद देशपांडे, अमोल वईकर, राजेंद्र वयकर, वसुधा सावरकर, रसाळ, रेखा मुळे, शुभांगी मुळे, लता मुळे, अलका देशपांडे, माया मुळे, आपटे आदींनी परिश्रम घेतले.