Breaking News

समाजाला प्रबोधनाची गरज- हभप दुशिंग


माळवाडगाव/प्रतिनिधी: संतांची भेट व संगत मिळणे सोपे नाही. संताच्या वचनावर पूर्ण विश्‍वास ठेवा. समाज त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. साधू-संतांनी केलेल्या प्रबोधनाची आज समाजाला खरी गरज असून त्यांचे विचार आत्मसात करावे, असा उपदेश ह.भ.प. कैलास महाराज दुशिंग यांनी गोंडेगाव येथे एका किर्तन महोत्सव समारंभात भाविकांना केला.

अक्षय्य तृतियानिमित्त वै.बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने येथे गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. गणेशानंद महाराज , तसेच 108 महंत विष्णूगिरी महाराज, ह.भ.प. ललितगिर महाराज, ह.भ.प. सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ह.भ.प. रोहिदास महाराजांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण किर्तन महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी जनार्दन शेजूळ व कानिफनाथ भक्त मंडळ यांनी भाविकांना भोजन दिले. या समारंभास ह.भ.प. कृष्णा , ह.भ.प. पाठक , चोपदार भाऊसाहेब मुठे, उद्योजक संदिप शूळ, ह.भ.प. विकास दुशिंग व भाविक भजनी मंडळ उपस्थित होते.