Breaking News

कराडला आयपीएल मॅचवर सट्टाप्रकरणी एकास अटक


कराड /प्रतिनिधी - येथील नगरपालिका परिसरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या युवकास कराड पोलिसांनी सापळा रचून ताब्यातघेतले. त्याच्याकडून 54 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अभिजीत आनंदा शेंद्रे (वय 24 रा. गुरूवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्ट चालू असलेबाबतची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथढवळे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून नगरपालिका परिसरात सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या संशयितास ताब्यातघेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रोख 32 हजार रूपये व सट्टासाठी लागणारे साहित्य असे एकूण सुमारे 54 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनीहस्तगत केला.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे व वाचक पोलीस उपनिरीक्षक सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रविण पवार,चंद्रकांत पाटील, सौरभ कांबळे, संतोष चव्हाण सहभागी होते.