Breaking News

राज्यभर पाण्याचा दुष्काळ तर सातार्‍यात सुकाळ


सातारा / प्रतिनिधी : या वर्षी कमी पर्यजन्यमान आणि कडक उन्हाळा यामुळे राज्यात भिषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी जनतेला दाही दिशा टाहो फोडवा लागत आहे. सातार्‍यात मात्र उलटे चित्र निर्माण झाले आहे. राज्यभर पाण्याचा दुष्काळ तर सातार्‍यात मात्र सुकाळ असे वास्तव पहावयास मिळत आहे. 

मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या हाकेच्या अंतरावरील पाणी पुरवठा करणारी जेल टाकी ओसंडून धोधोधो वाहत होती. पाणी पडण्याचा आवाज मोठा होता. त्यामुळे ढग फुटी झाली का काय असं जाणवत होतं. तरीही पालिकेचा पाणी पुरवठा विभाग कुंभकर्णी गाढ झोपेत होता. सुमारे अर्ध्यातासानंतर धोधो वाहणारी टाकी बंद झाली. 

कास तलावातील पाणीसाठ्यात कमालीची झालेली घट ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नगरिकांनो पाणी जपून वापरावे असे आवाहन करीत आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीची निर्णय जाहीर केला आहे. नगराध्यक्षा माधवी ताई नगरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन तुम्ही नागरीकांना करत आहात. आता हे आवाहन तुम्ही नागरीकांना करण्यापेक्षा तुमच्या कर्मचार्‍यांना करावे. कारण पाणी पुरवठा विभागात ढिसाळ कारभार सुरू आहे. 

शहराच्या अनेक भागात दररोज लाखो लिटर पाणी गटारगंगेला जात असते. पाणी कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी जर शहरातील गळतीची कामे दर्जेदार झाली तर पालिकेला पाणी कपातीची वेळ येणार नाही. पाणी पुरवठा कारभारात कशी सुधारणा होईल याकडे लक्ष द्यावे.