Breaking News

मोदींच्या समर्थनाच्या घोषणा देणार्‍यांशी प्रियंकांचे हस्तांदोलन!


Image result for priyanka gandhi

इंदूर: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मध्य प्रदेश दौर्‍यावर असताना इंदूरमध्ये त्यांच्या वाहन ताफ्यासमोर एका गटाने ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. त्या वेळी प्रियंका कार थांबवून उतरल्या आणि घोषणा देणार्‍या समर्थकांशी हस्तांदोलन केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. मध्य प्रदेश काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत मोदी यांना टोला लगावला आहे.

प्रियंका या इंदूरमधून रस्तेमार्गाने कारने जात होत्या. त्याचवेळी काही मोदी समर्थक त्यांच्या वाहन ताफ्यासमोर ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत होते. प्रियंकांनी लगेच कार थांबवली आणि उतरून त्यांच्याकडे गेल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच समर्थकांना शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटरवरून शेअर केला आहे. तो ‘सोशल मीडिया’वर  व्हायरल होत आहे.
इंदूरमधील काही लोकांनी ‘मोदी-मोदी’अशा घोषणा दिल्या, तेव्हा प्रियंका गांधी यांनी घोषणा देणार्‍या समर्थकांशी हस्तांदोलन केले. ‘तुम्ही तुमच्या जागी, मी माझ्या जागेवर...ऑल द बेस्ट!’ असं त्या म्हणाल्या. याला म्हणतात मातृभूमी, देशातील जनता आणि देशाच्या कणाकणावर असलेले प्रेम. खरेच मोदी यांनीही हा देश समजून घेतला असता तर? असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे.