Breaking News

मोदी भ्याड आणि घाबरट पंतप्रधानः प्रियंका गांधी


लखनऊ: मी आजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यासारखा भ्याड आणि घाबरट पंतप्रधान पाहिला नाही, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. त्या उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील प्रचारसभेत बोलत होत्या. मोठमोठ्या प्रचारसभांमुळे किंवा टीव्हीवर झळकल्यामुळे राजकीय ताकद वाढत नाही. तर जनता सर्वोच्च असते, याची जाण असणे ही खरी राजकीय ताकद असते. जनतेचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद, त्यांच्या समस्या सोडवण्याची ताकद, टीका सहन करण्याची ताकद आणि विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेणे यामध्ये खरी राजकीय ताकद असते; मात्र सध्याचे पंतप्रधान तुमचे म्हणणे ऐकून घेणे सोडा; पण तुम्हाला उत्तर देणेही गरजेचे समजत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.