Breaking News

मनपा कर्मचारी विद्याधर कुकडे बडतर्फ

अहमदनगर महानगरपालिक साठी इमेज परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी : गेल्या 9 वर्षापासून कामावर गैरहजर असलेल्या लिपिकाला महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. माळीवाडा प्रभाग कार्यालयातील टंकलेखक विद्याधर सीताराम कुकडे असे कारवाई झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. 9 एप्रिल 2011 पासून कोणतीही रजा मंजुरी न घेता ते परस्पर रजेवर गेले होते. 2013 मध्ये त्यांच्यावर चौकशी प्रस्तावित करण्यात आल्यानंतर त्यांनी कामावर रुजू करुन घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना कामावर रुजूही करुन घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ते गैरहजर आहेत.
कुकडे यांना नोकरीची गरज नसल्याचे निदर्शनास येत असून कार्यालयीन शिस्तीचा त्यांनी भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनपा अधिनियमातील कलम 56 (2)(ग) नुसार त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.