Breaking News

पाथर्डी तालुक्यातील चोरट्यांचा धुमाकूळ

पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर येथे गुरुवारी मध्यरात्री च्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी केली. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. घटनेने टाकळीमानुर गावासह पंचक्रोशीत घबराट पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावता किसन शिंदे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने 12 हजार 500 रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. यावेळी सदाशिव गाडेच्या एक तोळा सोने, चांदी, दागिने दहा हजार रुपयाचा मोबाईल ऐवज लंपास केला. सदाशिव गाडे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 250/19 चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.