Breaking News

बोरगाव-हिरडपाडा वळणावर अपघातात 3 जखमी

बोरगाव/प्रतिनिधी
सापुतारा वणी नासिक महामार्गावर बोरगाव जवळील हिरडपाडा येथील वळणावर सायंकाळी झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. बोलोरो एम.एच.15 डीएम 7491 व ट्रक के.ए.43 7939 यांच्यात बोरगाव तालुका सुरगाणा जवळील हिरडपाडा येथील धोकादायक वळणावर अपघात होऊन अण्णासाहेब कापडी वय 42 वनसगाव तालुका निफाड, शरद रायते, नाना शिंदे खडक माळेगाव ता. निफाड येथील असून ते गंभीर जखमी आहेत. हवालदार संतोष गवळी,  सामाजिक कार्यकर्ते अभय सोनवणे, गंगाधर भोये, गिरीधर भोये, नुराभाई यांनी जखमींना तात्काळ बोरगाव प्राथमिक केंद्रात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.