Breaking News

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामासांठी 8 कोटी मजूंर

 कोपरगाव ता/प्रतिनिधी
 तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्प 2019-20 अंतर्गत 8 कोटी 32 लाख रुपयांची मजूंरी मिळाली असल्याची माहिती आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
  यावेळी त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे राज्याचा अर्थसंकल्प चालू पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील कोपरगाव-वैजापूर राज्यमार्ग 65 मधील पढेगाव, जुना कालवा ते तिळवणी या रस्त्याच्या कामासांठी  4 कोटी तसेच राज्यमार्ग सात धामोरी, ब्राह्मणगाव, करंजी, दहेगाव बोलका, धोत्रे, खोपडी, प्रमुख जिल्हा मार्ग 4 मधील येसगाव जुन्या कालव्यावरील भूसंपादनासाठी 1 कोटी तर रवंदे टाकळी, पवार गिरणी, संवत्सर भोजडे, जिल्हा हद्द प्रमुख जिल्हा मार्ग 5 मजबूतीकरण डाबंरीकरण किलोमीटर 5 टाकळी व 33 ते 36.300 घोयेगाव, औरंगाबाद जिल्हा हद्द कामासाठी 3 कोटी 32 लाख अशी एकूण 8 कोटी 32 लाख रुपये खर्चास मान्यता मिळाली आहे. मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागावी, यासाठी गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनेतून तसेच केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून पैशांची उपलब्धता केली आहे. याशिवाय आणखी काही नॉन प्लॅन रस्त्यांच्या कामांचा समावेश या प्लॅनमध्ये करण्यासाठी आपली धडपड सुरू आहे. असे आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.