Breaking News

जल पुनर्भरणाच्या कार्यात नागरिकांनी सहभागी होण्याची गरज-फुलारी

भेंडे/प्रतिनिधी
  जमिनीतील जल पातळी वाढावी यासाठी पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविला पाहिजे. जल पुनर्भरणाच्या कार्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त नेवासे तालूका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भेंडे येथील बस स्थानक चौकात आयोजित जलयुक्त शिवार, शेततळ्याची उपयोगिता, भूजल उपसा आणि भूजल कायदा याविषयावरील व्याख्यानात जलमित्र सुखदेव फुलारी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, डॉ.अशोकराव ढगे, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, ज्ञानेश्‍वरचे संचालक जनार्दन पटारे, अशोकराव मिसाळ, जगन्नाथ कोरडे, काँग्रेसचे सरचिटणीस संदीप क्षिरसागर व्यासपीठावर उपस्थित होते.
   यावेळी फुलारी पुढे म्हणाले की, 20 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यभर पाणी याविषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेतले. ही खूप महत्त्वाची बाब आहे. यामुळे गावपातळीवर विचार मंथन होऊन प्रत्येक नागरिक जलसाक्षर होईल. पाणी आणि ऑक्सिजन हे सजीव सृष्टीतील महत्वाचे घटक आहेत. शास्वत पाण्यासाठी जमिनीतील अमर्याद पाणी उपसा जलपातळी वाढविली पाहिजे. तसेच शुद्ध हवा आणि ऑक्सिजन साठी वृक्ष लागवड व संवर्धन झाले पाहिजे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गावे पाणीदार होण्यास मदत होईल. मात्र, या योजनेत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या शेतातील बांध मोठे करून पावसाचे पाणी शेता बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली तर नक्कीच गावाची जल पातळी वाढेल. याच बरोबर बोअरच्या खोलीवर निर्बंध आणले पाहिजे. टंचाईच्या काळात पिकांना संरक्षित पाणी मिळावे, यासाठी शेततळ्याची संकल्पना आहे.
  यावेळी भानुदास कावरे, गोरक्षनाथ कापसे, अशोक वायकर, सरपंच सुनील खरात, अंबादास गोंडे, कुमार नवले, हरिभाऊ नवले, बाळासाहेब आरगडे, कृष्णा उगले, बापूसाहेब सुपारे, संभाजी माळवदे, ज्ञानेश्‍वर आरगडे व आदी उपस्थित होते.