Breaking News

पारनेर शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी संदीप मोढवे

पारनेर/प्रतिनिधी
 शिवसेनेच्या पारनेर उपशहरप्रमुखपदी संदीप मोढवे यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी मुंबईत मोढवे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
  विजय औटी यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या मोढवे यांनी पारनेरच्या विसर्जित ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सुरुवातीपासून पक्षसंघटनेमध्ये निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करणार्‍या मोढवे यांच्यावर पक्षाने उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सेनेचे संघटन आणखी मजबूत करण्याचे ध्येय त्यांच्यापुढे आहे. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून संघटनेसाठी शंभर टक्के योगदान देणार असल्याचे मोढवे यांनी सांगितले. मोढवे यांचे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहोकले, अनिकेत औटी, दत्तात्रेय कुलट, डॉ. श्रीकांत पठारे, शाहीर गायकवाड, निलेश खोडदे आदींनी अभिनंदन केले.
फोटो ओळी
 संदीप मोढवे यांची शिवसेनेच्या पारनेर उपशहरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.