Breaking News

कमी गुण मिळाले तर निराश होऊ नका - विजयकुमार राऊत

जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

अहमदनगर/प्रतिनिधी
जिद्द व चिकाटी असेल, तर सर्व काही मिळवता येते. इंग्रजी विषयात 1 गुण मिळाला, तरीही मी हार न मानता मनात जिद्द निर्माण केली. आणि दहावीमध्ये 90 टक्के गुण मिळविले. आयुष्य घडवायचे असेल, तर मनामध्ये ध्येय ठेवा आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. फक्त गुण मिळविणे हे ध्येय न ठेवता, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. कमी गुण मिळाले म्हणून निराश होऊ नका. पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन कस्टम अ‍ॅण्ड सेंट्रल जीएसटीचे सुप्रिटेंडेंट विजयकुमार राऊत यांनी केले.
  जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजमधील 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कस्टम अ‍ॅण्ड सेंट्रल जीएसटीचे सुप्रिटेंडेंट विजयकुमार राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मृणालिनी गोरे, सचिव नंदकुमार गोरे, रजिया इनामदार, प्रा. कृष्णा बर्हाटे, उमा चेन्नूर, शर्वरी गोरे, प्रदीप दुसुंगे आदी उपस्थित होते.
  राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुले मागे का आहेत, याचे सर्वांत महत्त्वाचे कारण त्यांना असलेले अपुरे ज्ञान. शिक्षण क्षेत्रात उपलब्ध असणार्‍या संधीची माहितीच नसते. एमपीएससी, यूपीएससीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असेल, त्या व्यतिरिक्त पण मुलांनी इतर स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन अभ्यास करावा.
 आपल्याला जे ध्येय मिळवायचे आहे, ते आपण आपल्या हिमतीवर मिळवावे, कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नये, असे ते म्हणाले.
  यावेळी सचिव नंदकुमार गोरे म्हणाले की, विद्यालयाने गेल्या 10 वर्षांपासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयात सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत, विद्यालयाच्यावतीने जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष कै. माधवराव मुळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला, विज्ञान व कॉमर्स शाखेतून 85 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांंना रोख 21 हजार रुपये पारितोषिक विभागून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजमधील 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कस्टम अ‍ॅण्ड सेंट्रल जीएसटीचे सुप्रिटेंडेंट विजयकुमार राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मृणालिनी गोरे, सचिव नंदकुमार गोरे, रजिया इनामदार, प्रा. कृष्णा बर्हाटे, उमा चेन्नूर, शर्वरी गोरे, प्रदीप दुसुंगे आदी उपस्थित होते.

विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी
नीलम गुळवे (491 गुण), तेजस अमृते (446 गुण), कला शाखा - अश्‍विनी सुरवे (472 गुण), सौरभ भोर (448 गुण), कॉमर्स शाखा - लक्ष्मण पाटील (458 गुण), खिजा बागवान (448 गुण).

 गुणवंत विद्यार्थ्यांंना 21 हजार रुपयांचे पारितोषिक
जय पार्वतीमाता विद्यालयाच्यावतीने जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष कै.माधवराव मुळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला, विज्ञान व कॉमर्स शाखेतून 85 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांंना रोख 21 हजार रुपये पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे.